देवरुख : भाजपचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमोद अधटराव यांना दिले आहे. अधटराव यांच्या खांद्यावर विधानसभा महायुती भाजपा समन्वयक पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. शिंदे सेनेचे विधानसभा समन्वयक सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव यांची महायुती समन्वय पदी नियुक्ती झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 23/Oct/2024












