Chandrashekhar Bawankule : महसूल विभागामार्फत करण्यात येणाऱ्या जमीन मोजणीसंदर्भात अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. जमीन मोजणी (Land Survey) आता अवघ्या 30 दिवसात होणार आहे. राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
परिणामी या निर्णयामुळे जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे मार्गी लागणार आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, जमीन मोजणी प्रकरणांचा 30 दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यात पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक असणार आहे.
Land Survey : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांत होणार
याआधी राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. शेतीची, जमीनीच्या हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांमध्ये होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bavankule) हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. पूर्वी 1000 ते 4000 रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येणारे शुल्क आता अवघ्या 200 रुपयावर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी कमी खर्चात करता येणार आहे.
जमीन मोजणी ही शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. जमिनीच्या सीमांचे निर्धारण अचूकपणे करण्यासाठी मोजणी आवश्यक असते. बऱ्याच वेळा जमिनीच्या सीमांवरून वाद निर्माण होतात, त्यामुळे या मोजणीला प्राधान्य दिलं जातं. शिवाय जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी व न्यायालयीन प्रकरणांसाठी सरकारचा जमीन मोजणीचा अहवाल महत्त्वाचा ठरतो.
जमीन मोजणीचे तीन प्रकार
साधी मोजणी: साधी जमीनीची मोजणी करण्यासाठी साधारण सहा महिने लागतात. यासाठी सरकारला 1000 रुपये जमीन मोजणी शुल्क भरावे लागते.
तातडीची मोजणी: आपल्या जमिनीची मोजणी तातडीने करण्यासाठी ही तीन महिन्यांची असलेली जमीन मोजणीची प्रक्रीया आहे. यासाठी जमीन मालकाला किंवा शेतकऱ्याला सरकारला 2000 रुपयांचे मोजणी शुल्क भरावे लागते.
अतितातडीची मोजणी: यात दोन महिन्यांच्या कालावधीत जमीनीची मोजणी केली जाते. यासाठीचे मोजणी शुल्क 3000 रुपये आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 11-10-2025














