रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी आदी भागात भातशेती कापणीला आली असताना मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नुकसान झाले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
जिल्हयातील शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी श्री. सावंत यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्या कार्यालयाला भेट देऊन केली. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत करतानाच ही मागणी करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, आयटी जिल्हा संयोजक नीलेश आखाडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 23-10-2024












