Devrukh : देवरूख सद्‌गुरू वाचनालयातर्फे दिवाळी अंक अभिसरण योजना

देवरूख : शहरातील श्री सद्‌गुरू लोकमान्य वाचनालयाच्या वतीने दिवाळी अंक अभिसरण (सर्क्युलेशन) योजना राबवली जाणार आहे. ही योजना ३ महिन्यांसाठी असून यामध्ये दर्जेदार दिवाळी अंक घरी वाचावयास मिळणार आहेत. दिवाळी अंकाच्या उपलब्धतेनुसार ही योजना दिवाळी पूर्वी किंवा दिवाळीनंतर सुरू होणार आहे. जास्तीत जास्त साहित्यप्रेमी रसिकांनी दिवाळी अंक अभिसरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालय अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 11/Oct/2025