रत्नागिरी : महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी ८ ऑक्टोबर रोजी स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे झाली. यात सादर झालेल्या सात एकांकिकामध्ये शहराजवळील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या “जाळ्यातील खीळे” प्रथम क्रमांकाने बाजी मारली. फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेट अँड टेक्नोलॉजीच्या ‘ठोंग्या’ द्वितीय, याच महाविद्यालयाच्या ‘तुकारामची टोपी’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. संजय केतकर यांच्या हस्ते नटराजपूजन व श्रीफळ वाढवून झाले. त्यानंतर दिवसभर या सात एकांकिकेचे सादरीकरण झाले. या एकांकिका स्पर्धेत सांघिक निकाल असा मत्स्य महाविद्यालय शिरगाव ‘जाळ्यातील खीळे’ प्रथम, फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजीच्या ‘ठोग्या’ व ‘तुकारामची टोपी’ या एकांकिकांनी द्वितीय-तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य : विद्यार्थीनी गायत्री शिंदे (एकांकिका-तुकारामची टोपी), वाचिक अभिनय नैपुण्य: भाविका महेश माने (एकांकिका जाळ्यातील खिळे), अभिनेता नैपुण्य: विक्रांत खानविलकर (एकांकिका – काहीतरी अडकलंय), अभिनय नैपुण्य अभिनेत्री : राधा टिकेकर (एकांकिका-पैठणी), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: अमत्य अमित देसाई (एकांकिका-ढोंग्या), सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : प्रसाद नारायण फडके (एकांकिका-ढोंग्या) आदींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रात्री बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी यावेळी पुरुषोत्तम करंडकचे परीक्षक वामन जोग, अनिरुद्ध दिंडोरकर, विनय कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी-लेखक अनिल दांडेकर, कलोपासक-पुणे चे प्रदीप पाटसकर, उद्योजिका अपूर्वा सामंत यांच्यासह कलोपासकचे पदाधिकारी व येथील ज्येष्ठ रंगकर्मी तसेच महाविद्यालयीन सात संघाचे विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना उद्योजिका अपूर्वा सामंत म्हणाल्या, “नाट्य क्षेत्रातून कलाकार आपल्या भावना रसिकांपर्यत पोचवतात हे काम मोठ आहे. सोशल मिडियाच्या युगात जस-जस जग पुढे चाललं आहे. तस-तस ही कला पाठी रहात चालली आहे. तरीदेखील आपल्या काही पारंपारिक प्रथा आहेत त्या रसिकांपर्यत तंतोतंत पोचविण्याचे काम विद्यार्थी कलाकार करत आहेत. ज्या पद्धतीने प्रतिसाद दिलात त्यामुळे तुमच्याशी संवाद सादण्याचा मोह आवरला नाही.”
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाट्यगुणांना सकस व्यासपीठ मिळावे, या हेतूने गेली ५९ वर्षे, ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा होत आहे. स्पर्धेचे हे ६० वे वर्ष आहे. जे तीन विजेते संघ आहेत. त्यांना टिप्स देताना आयोजकांनी अंतिम फेरी डिसेंबर महिन्यात पुण्यात होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 11/Oct/2025














