गुहागर मतदारसंघातून ‘मनसे’कडून प्रमोद गांधी

गुहागर : गुहागरातून प्रमोद गांधी यांची गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असून, शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयासमोर मनसे पदाधिकाऱ्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, सुनील मूकनाक, नीलेश गमरे, सुजित गांधी, मनसे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, विवेक जानवळकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले की, विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. गुहागर विधानसभा मतदारसंघात नवनिर्माण करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी हे असंख्य मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 23-10-2024