रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत धामणसे मार्फत संपूर्ण गावामध्ये ग्रामस्थ व बचत गटाच्या सहकार्याने आज एक दिवस स्वछता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमे मध्ये सरपंच श्री अमर रहाटे उपसरपंच सौं. ऋतुजा कुलकर्णी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच अभियानाची जनजागृती करण्या साठी तसेच कराची वसुली करण्या साठी सर्व वार्ड मेम्बरच्या नेतृतवा खाली वार्ड सभा कॉर्नर सभा घेण्यात आल्या. सर्व उपक्रमा मध्ये ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. अभियानाला आर्थिक स्वरूपात सुद्धा लोकवर्गणी प्राप्त होत आहे प्रत्यक्ष कुटुंबाने 200/- रुपये लोकवर्गणी देण्याचा निर्धार ग्रामसभे मध्ये करण्यात आला आहे.
तसेच गावातील संस्था, श्री रत्नेश्वर वाचनालय, विविध कार्यकारी सोसायटी, हायस्कुल, शाळा सुधार समिती, व इतर स्थानिक संस्था यांच्या मार्फत सुमारे 20000/-रुपये लोकवर्गणी प्राप्त झाली आहे. तसेच उपसरपंच सौं. ऋतुजा कुलकर्णी यांनी आपले एक महिन्याचे मानधन रुपये 3000/- या अभियाना साठी लोकवर्गणी म्हणून दिले आहे आणि गावातील शिक्षकांनी सुद्धा या अभियानात सहभागी होऊन लोकवर्गणी सुद्धा दिली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचा निर्धार धामणसे ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष देविदास इंगळे, जिल्हा सचिव संजय दळवी, जिल्हा महिला संघटक सानिका शिंदे, प्रभारी सचिव जी. के. खरंबाळे, महिला उपाध्यक्ष पुजा कोकरे, जिल्हा माहिती प्रमुख संजय कुंभार, विष्णुदास बुंदे, सुरेश भगत, संतोष रोकडे उल्हास कोळी, विजय बेंदे, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला वर्ग, गामस्थ उपस्थित होते
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 11/Oct/2025














