चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द व सावर्डे येथे गांजा व विनापरवाना दारू बाळगल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सावर्डे आणि चिपळूण पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतरच दारू, गुटखा, गांजा, मटका, जुगार या अड्ड्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. त्यामुळे वर्षभरात हे धंदे कायमस्वरूपी बंद होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्यातील पिंपळी खुर्द बाजारपेठ येथील एका घराच्या मागील गोडावूनमध्ये तब्बल ५९ हजार ४०० रूपयांचा ९९० ग्रॅम वजनाचा दोन प्लास्टीक पिशव्यांमध्ये भरून ठेवलेला गांजा सापडला. यामध्ये तपकिरी रंगाची पाने, फुले, बिया होत्या. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी रोहिदास बाळू पवार (२८, रा. पिंपळी खुर्द) या तरूणाला अटक केली आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये सावर्डेनजिक आबीटगावच्या सीमेलगत एका महिलेने विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तिने २ हजार ७०० रूपये किमतीची तीस लीटर गावठी दारू बाळगल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे तर खेर्डी येथे शुभम अपार्टमेंटच्या मागे बेकायदा दारू बाळगल्याप्रकरणी सुनील दगडू महाडिक (७०, रा. खेर्डी विकासवाडी) या वृद्धावर गुन्हा दाखल झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 23/Oct/2024














