चिपळूण : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले. ही बैठक गुहागर शुंगारतळी, भवानी सभागृह येथे उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या बैठकीत सर्व मंडल अध्यक्ष यांनी आपला अहवाल सादर केला, GST, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान बाबत जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक यांनी माहिती दिली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. स्मिताताई जावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, माजी आमदार डॉ विनयजी नातू साहेब, जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे साहेब यांनी आगामी काळात येणाऱ्या निवडणुका संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले आणि संघटनात्मक आढावा घेतला. जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी अतिशय सुंदर सुत्रसंचलन केले यावेळी व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश रांगळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 11/Oct/2025














