◼️तिसऱ्या दिवशी वीणा मांजरेकर ठरल्या मानकरी, केली साडेअकरा लाखांची सोनेखरेदी!
➡️ रत्नागिरी: ‘रत्नागिरी खबरदार’ आयोजित ‘दिवाळी शॉपिंग फेस्ट २०२५’ मध्ये ग्राहकांच्या उत्साहाने आणि खरेदीच्या विक्रमांनी नवा उच्चांक गाठला आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी, शनिवारी, देखील ग्राहकांची प्रचंड गर्दी कायम राहिली. आजच्या दिवसाच्या सर्वाधिक खरेदीदार म्हणून वीणा मांजरेकर या मानकरी ठरल्या आहेत. त्यांनी मुख्य प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या स्टॉलवरून तब्बल ११ लाख ४७ हजार ९९६ रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली.
या विक्रमी खरेदीबद्दल आयोजकांच्या वतीने वीणा मांजरेकर यांना एक ग्रॅम सोन्याचे नाणे (गोल्ड क्वाईन) देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान ज्येष्ठ पत्रकार श्री. अलीमिया काझी आणि रेहमत काझी यांच्या शुभहस्ते जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे व्यवस्थापक श्री. मांडवकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
◼️विक्रमी खरेदीची परंपरा तिसऱ्या दिवशीही कायम
रत्नागिरीतील दर्जेदार ग्राहक या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. काल, शुक्रवारी, याच स्टॉलवर एका ग्राहकाने १३ लाख ५७ हजारांहून अधिक रुपयांची खरेदी केली होती. त्यानंतर आज पुन्हा साडेअकरा लाखांची खरेदी झाल्याने जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचा स्टॉल ग्राहकांसाठी मुख्य आकर्षण ठरल्याचे सिद्ध झाले आहे. सोन्याच्या दागिन्यांची मनमोहक डिझाईन्स आणि खरेदीवरील आकर्षक योजनांमुळे ग्राहकांचा ओढा या स्टॉलकडे वाढत आहे.
◼️दागिन्यांपलीकडील खरेदीचा उत्सव
हे प्रदर्शन केवळ सोने-चांदीच्या खरेदीपुरते मर्यादित नाही. दिवाळीसाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू येथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत. आकर्षक कंदील, रंगीबेरंगी पणत्या, सुबक तोरणे, रांगोळी आणि विशेषतः बाजारात कुठेही न मिळणारे हस्तनिर्मित (Handmade) उत्पादने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. याशिवाय कपडे, सौंदर्य प्रसाधने, गृहोपयोगी वस्तू, दुचाकी, पेंटिंग्ज आणि फुलझाडे यांचे स्टॉल्सही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
◼️ग्राहकांसाठी विशेष आकर्षण – पैठणीचा मान
खरेदीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आयोजकांनी ठेवलेली पैठणीची योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. प्रदर्शनातील कोणत्याही एका स्टॉलवर २००० रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यास केवळ ६९९ रुपयांत सुंदर पैठणी साडी मिळत असल्याने महिला वर्गात मोठा उत्साह दिसून येत आहे.
◼️उद्या शेवटचा दिवस, सुवर्णसंधी चुकवू नका!
९ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या या भव्य खरेदी उत्सवाचा उद्या, १२ ऑक्टोबर (रविवार) हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्या रत्नागिरीकरांना अद्याप या फेस्टला भेट देता आली नाही, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या दिवाळीची खरेदी एकाच ठिकाणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
◼️दिवाळी शॉपिंग फेस्ट २०२५
स्थळ: जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी
शेवटचा दिवस: १२ ऑक्टोबर २०२५ (रविवार)
वेळ: सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
21:07 11-10-2025














