चिपळुणात ३० ऑक्टोबरला कुमार, कुमारी गट कबड्डी निवड चाचणी

चिपळूण : चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ३० ऑक्टोबर रोजी कुमार, कुमारी निवड चाचणी कोल्हेखाजण येथे संतोष शिर्के यांच्या ओम अॅकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

यासाठी सहभागी संघांनी सकाळी ८.३० वा. उपस्थित रहावे. सर्व संघांनी आपल्या संघांचे रजिस्ट्रेशन २७ ऑक्टोबरपूर्वी असोसिएशनकडे करावे. तसेच कुमार, कुमारी फाईल २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ पर्यंत विलास गुजर (प्रमुख कार्यवाह) यांच्याकडे देण्यात याव्यात.

सहभागी खेळाडूंची जन्मतारीख ९ डिसेंबर २००४ नंतरचा जन्म असावा, वय २० वर्षांच्या आत तर वजन ७० किलोच्या आत असणे आवश्यक आहे.

या निवड चाचणीमध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश तांबे, कार्याध्यक्ष एल. के. शिंदे, प्रमुख कार्यवाह विलास गुजर, खजिनदार भूषण कुलकर्णी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 23/Oct/2024