चिपळूण : कळंबस्तेत वाढलाय बिबट्याचा वावर

चिपळूण : शहरालगत कळंबस्ते येथे भरवस्तीमध्ये बिबट्याने महिनाभरात चार कुत्र्यांवर हल्ला करत ठार मारले आहे. गेल्या आठवड्यात रात्री येथील एका घराच्या पायरीवर बसलेल्या कुत्र्याला बिबट्याने उचलून नेले असून, ही घटना घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

कळंबस्ते येथे गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेक घरांच्या सीसीटीव्हीमध्ये त्याचा वावर दिसून आला आहे. महिनाभरात चार घरांतून बिबट्याने कुत्र्यांना नेले आहे. गत आठवड्यातील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने रात्री-अपरात्री लोटे, खेर्डी औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या कामगारांमध्ये तसेच येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले याबाबत दोन महिन्यांपूर्वी कळंबस्ते ग्रामपंचायतीने वन विभागाकडे संपर्क साधला होता. तेव्हा वनविभागाचे दोन कर्मचारी येऊन गेले. मात्र त्यांनी कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

गुरुवारच्या घटनेनंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी माजी सभापती शौकत मुकादम यांची भेट विषयासंदर्भात चर्चा केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 23/Oct/2024