पावस : कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पावस परिसरामध्ये भात कापणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी कापणीच्या कामामध्ये मग्न झाले आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे भात कापणीच्या वेळेलाच नेमका काही दिवस पावसाने संततधार सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले होते.
त्यामुळे पाऊस थांबण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना निर्माण झाली होती, परंतु गेले दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असून कापणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये भात कापणी करून सायंकाळच्या वेळी पेंड्या बांधून झोडणीकरिता शेतकरी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पावस मंडळ कार्यालयाअंतर्गत गावामध्ये सुमारे १८०० हेक्टर मध्ये भात कापणी सुरुवात झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 13/Oct/2025














