रत्नागिरी : देवरूख निवे बु. तेलीवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी दारू बाळगणाऱ्या संशयिताविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.२४ वा. सुमारास करण्यात आली.
सुरेश सोमा जोशी (६३, रा. निवे बु. जोशीवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी संशयित हा आपल्या ताब्यात गावठी हातभट्टीची ५७० रुपयांची ५ लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 13/Oct/2025














