दापोली : भारतीय जनता पार्टी दापोली शहराध्यक्षपदी अतुल गोंदकर यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षा जया साळवी यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, माजी. तालुकाध्यक्ष व जिल्हा चिटणीस संजय सावंत, माजी. दिव्यांग सेल जिल्हा संयोजक रवींद्र गायकवाड, कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष स्वरुप महाजन, ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन होडबे, तालुका सरचिटणीस विवेक भावे, संदीप केळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अनुजा साळुंखे, तालुका चिटणीस संजय घाडगे, जिल्हा संवादक अमोल चोरगे, सोशल मीडिया तालुका संयोजक धिरज पटेल, मयुरेश वेल्हाळ, राजेश पवार, नवनाथ जाधव आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 13/Oct/2025














