रत्नागिरी : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली एकात्म मानव दर्शन ही संकल्पना सर्व विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगतानाच मानवता कशी जोपासावी? अंत्योदय संकल्पना याबाबत डॉ. राजेश राजम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शासकीय रत्नागिरी येथील राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण महिला विद्यालयात संस्थेच्या अंत्योदय दिवस व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त डॉ. राजम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राचार्य आर. डी. जानवेकर तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन एस. एम. वेतोसेकर, तर सूत्रसंचालन टी. एस. पाटील यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 13/Oct/2025














