चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका कंपनीत बांधकामादरम्यान उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ९ ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ईजाज अहमद (वय २५, रा. लोटे एमआयडीसी, मूळ गाव डोमाहना, पश्चिम बंगाल) हा पहिल्या मजल्यावर आरसीसी स्टील वाकवण्याचे काम करत असताना तोल जाऊन २० फूट उंचीवरून खाली पडला.
त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना प्रवासादरम्यान त्याची स्थिती बिघडली. त्यानंतर कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 13/Oct/2025














