पावस : रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडीखुर्द येथील कृषी चिकित्सालय फळरोपवाटिकेमध्ये फलोत्पादन पिकावरील कीडारोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत कार्यशाळा झाली. या वेळी रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख आदी उपस्थित होते.
कार्यशाळा दोन सत्रामध्ये घेण्यात आले. फिरोज शेख यांनी प्रास्ताविक केले. तद्वंतर कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांनी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञानकेंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हणमंते यांनी नैसर्गिक शेती विषयावर माहिती सांगितली. शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी आंबा व काजूपिकावरील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापनावर माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 13/Oct/2025














