चिपळूण : प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थीना वर्षाला तीन गस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. त्यामुळे गॅस कनेक्शन आपल्या नावे करण्यासाठी महिलांची गॅस वितरणे केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे त्यामुळे गॅस वितरण केंद्रावर प्रचंड ताण येत आहे. योजनेचे लाभार्थी नक्की कोण असतील, याचाबत संभ्रम असताना सर्वच महिला आपल्या नावावर गॅस कनेक्शन करण्यासाठी अर्ज करत आहेत. चिपळूण तालुक्यामध्ये साडेपाच हजारांहून अधिक महिलांनी त्यासाठी अर्ज केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जाहीर केलेल्या सर्व योजना स्थगित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीना तीन सिलेंडर मिळणार की, नाही याबाबत शंका आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थीना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील.
यामध्ये आता लाडकी चहोण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे. दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी किती कुटुंबांना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो, हे अजून स्पष्ट झालेले नाही. तीन गॅस सिलिंडरचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी काही महिला कुटुंबातील आपल्याच नातेवाइकांना अंधारात ठेवून गॅस कनेक्शन आपल्या नावावर करण्यासाठी अर्ज करत आहेत. गॅस कनेक्शन नावावर करताना केवायसी गरजेची आहे.
“नवीन गॅस कनेक्शन घेणे आणि दुसऱ्याच्या नावावर ते हस्तांतर करणे या दोन्ही किचकट प्रक्रिया आहेत. १० ऑक्टोबरपासून आमच्या एजन्सीमध्ये ४७० अर्ज आले आहेत सर्व अर्ज भरताना त्यातील नियम व अटीशर्थी बारकाईने बघाव्या लागतात. प्राप्त अर्जांपैकी किती अर्ज पात्र होतील, हे आता निश्वित सांगता येत नाही. – अमित शिंदे, गॅस एजन्सी खेर्डी
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थींना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. काही महिलांना त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाल्यामुळे सर्वच महिला गॅस कनेक्शन आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमची एजन्सी लहान असल्यामुळे आमच्याकडे दिवसाला पंधरा ते वीस अर्ज येतात. – आकाश शिंदे, व्यवस्थापक, पोफळी एजन्सी
गॅस वितरकांची संख्या
चिपळूण- ३
खेर्डी- १
निवळी – १
पोफळी- १
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 23-10-2024














