राजापूर : राजापूर तालुक्यात धाडसी चोरीचे सत्र सुरूच असून शुकवारी शहरातील कोंढेतड, भंडारवाडी परिसरातून एका अज्ञात चोरट्याने दहा हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस ही दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. वारंवार घडणाऱ्या या दुचाकी चोरी घटनांमुळे राजापूरात भितीचे वातावरण आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण रामेश्वर नगर, येथील रहिवासी असलेले गणेश कृष्णा तेली (44) यांनी या चोरीप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांची दहा हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल कोंडेतड, भंडारवाडी येथे उभी केलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्याने ती चोरून नेली. 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजल्यापासून ते दुसरया दिवशी, म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या मुदतीत ही चोरी झाली आहे.
राजापूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजापूर तालुक्यातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या अज्ञात आरोपीचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 13/Oct/2025














