Dapoli : दापोली पंचायत समिती गटनिहाय आरक्षण जाहीर

दापोली : दापोली पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठीचे गटनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. एकूण १२ गणांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

१. सर्वसाधारण प्रवर्ग (Open)
जुईकर मोहल्ला
पालवण
जालगाव
टेटवली
पांगरी (तर्फ हेवली)

२. मागास प्रवर्ग (OBC)
केळशी

मागास प्रवर्ग स्त्री (OBC Woman)
कोळबांद्रे
चिकलेवणे

४. सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री (Open Woman)
खेर्डी
बुरोंडी
दाभोळ

५. अनुसूचित जमाती प्रवर्ग स्त्री (ST Woman)
हर्णे

आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता कोणत्या गणातून कोणता उमेदवार निवडणूक लढवणार, याकडे दापोलीकरांचे लक्ष लागले आहे. पक्षीय स्तरावर पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी चर्चाना सुरुवात झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 13/Oct/2025