Sangameshwar : विनापरवाना फिरणाऱ्या फेरीवाल्यांना अस्तान हद्दीत बंदी

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील अस्तान ग्रामपंचायतीने ग्रामसभेत विनापरवाना फिरणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर बंदीचा ठराव पारित केला आहे. अस्तान ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या सणघर, चाटव, अस्तान, धवडे व किंजळेतर्फे खेड गावांमध्ये कोणत्याही परप्रांतीय फेरीवाल्यांना ग्रामपंचायतीच्या पूर्वपरवानगीशिवाय फिरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करता गावात फेरीवाले दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 13/Oct/2025