Khed : अचानक छातीत दुखू लागल्याने वृद्धाचा मृत्यू

खेड : शहरातील एकविरा नगर येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा छातीत अचानक दुखू लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १० ऑक्टोबर) सकाळी घडली. मृत व्यक्तीचे नाव अशोक यशवंत देवरुखकर (वय ७२, रा. एकविरा नगर, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे आहे.

सकाळी सुमारास पाचच्या दरम्यान त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने नातेवाइकांनी तत्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांनी प्राण सोडले. या घटनेची खेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 13/Oct/2025