चिपळूण : गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफ विस्ट कंपनीच्या कंत्राटी कामगारांना कंपनीने कामावर न घेतल्याने दि. १४ रोजी उपोषणाचा इशारा दिला होता; मात्र या संदर्भात रत्नागिरी येथे कामगार आयुक्त कार्यालयात कंपनी व्यवस्थापन, कामगार संघटना यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत टप्प्याटप्प्याने उर्वरित कामगारांना रूजू केले जाईल, असा निर्णय झाल्याने मंगळवारी होणारे उपोषण कामगारांनी स्थगित केले आहे.
साफ यिस्ट कंपनीमध्ये २३० कंत्राटी कामगार आहेत. त्यापैकी १३० कामगारांना कंपनीने कामावर घेतले होते व उर्वरित कामगार बाहेरच होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने कठोर भूमिका घेतली होती व कामगारांना पाठिंबा दिला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 14/Oct/2025














