गुहागर : सोमवारी गुहागर पंचायत समिती सभागृहात जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत व तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत जाहीर झाली. या अरक्षणातून पुरुष व महिलांना समान संधी असणार आहे, हे स्पष्ट होत आहे.
पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण पडल्याने अनेकांना संधी उपलब्ध झाली तर अनेकांच्या आशा पल्लवितदेखील झाल्या. आता पंचायत समिती गणनिहाय तालुक्यातील आरक्षण सोमवारी जाहीर झाले असून अनेक इच्छुक आपली मोर्चेबांधणी सुरू करणार आहेत.
यावेळी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अंजनवेल गाण सर्वसाधारण स्त्री, असगोली गण सर्वसाधारण स्त्री, तळवली गण सर्वसाधारण, शृंगारतळी गण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, मळण् गण-सर्वसाधारण स्त्री, कोंडकारून गण-सर्वसाधारण, वेळणेश्वर गण सर्वसाधारण, शौर गण सर्वसाधारण स्त्री, पडवे गण-सर्वसाधारण, पाचेर्र सडा गण-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, स्त्री असे आरक्षण पडले आहे. य आरक्षणानंतर अनेकजण आपलं मोर्चेबांधणी करणार आहेत.
अनेकांचा हिरमोड
तालुक्यातील असगोली जि. प. गटासाठी सर्वसाधारण, शृंगारतळी गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), कोंडकारूळ गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी खी), वेळणेश्वर गटासाठी सर्वसाधारण स्त्री, पडवे गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) असे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.
जि. प. गटाचे आरक्षण जाहीर
यामध्ये असगोली जि. प. गटासाठी सर्वसाधारण, शृंगारतळी गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), कोडकारूळ गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी स्त्री), वेळणेश्वर गटासाठी सर्वसाधारण स्त्री, पडवे गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण जाहीर झाले या आरक्षणातून अनेकांचा हिरमोड झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 14/Oct/2025














