Ratnagiri : छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

देवरूख : जिल्ह्यातील तरुण-तरुणींना स्थानिक प्रश्नांवर विचार करण्यास आणि आपल्या लेखणीतून ते मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देवरुख गाव विकास समितीच्या वतीने दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी स्पर्धेचे ७ वे वर्ष असून या स्पर्धेसाठी निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर आहे.

गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे, उपाध्यक्ष राहुल यादव, उपाध्यक्ष मंगेश धावडे व जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयीन खुल्या गटासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा; सद्यस्थिती, आव्हाने आणि अपेक्षा व पलीकडे आंबा-काजूच्या रत्नागिरीतील कृषी विकास का झाला नाही? असे दोन विषय निश्चित करण्यात आले आहेत. स्पर्धकांनी १००० ते १२०० शब्दांत स्व-लिखित आणि मराठी भाषेतील निबंध सादर करणे आवश्यक आहे. प्रथम क्रमांकास ५००१ व द्वितीय ३००१ रुपये याशिवाय ५ उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धकांनी निबंध एम. जी. टेक्नॉलॉजी, देवरुख, तालुका-संगमेश्वर या पत्त्यावर अंतिम मुदतीपर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी दीक्षा खंडागळे, अनघा कांगणे, नितीन गोताड व मुझम्मिल काझी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गाव विकास समितीने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 14/Oct/2025