देवरूख : विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत समग्र शिक्षा समावेशीत शिक्षण अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक तपासणी शिबिर देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयात पार पडले. या शिबिरामध्ये ६० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात बौद्धिक अक्षम, अध्ययन अक्षम, अस्थि व्यंग, बहू विकलांग इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची ० ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
यावेळी सुरेखा पात्रे, सहायक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अंतर्गत नोडल अधिकारी संकेत चाळके, समन्वयक आनंद लोकरे, डॉ. मोरे (तालुका वैद्यकीय अधिकारी), विजय परीट (गटशिक्षणाधिकारी पं. स. देवरुख), तानाजी नाईक (शिक्षण विस्तार अधिकारी देवरूख), डॉ. कुणाल देसाई (व्यवसाय उपचार तज्ज्ञ), डॉ. ढोकळे (नेत्र तज्ज्ञ), डॉ. निखिल (अस्थिव्यंग तज्ज्ञ), सचिन सारोळकर (मानसोपचार तज्ज्ञ), जिवंत तांदळे (मानसोपचार तज्ज्ञ), नितीन लोनिष्टे (मानसोपचार तज्ज्ञ), डॉ. संदीप माने (वैद्यकीय अधीक्षक बालरोग तज्ज्ञ), सीमा गिडये (तालुका विधी समन्वयक), डॉ. गौरव धामणे (आर. बी. एस. के. पथक प्रमुख), शंतनेश्वर ढवळे, भूपाली देसाई, सानिका भितळे, परमेश्वर मेतलवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन शंतनेश्वर ढवळे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 14/Oct/2025














