Chiplun : चिपळुणात ‘वाचू आनंदे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण : चिपळूण नगरपालिका, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या वाचू आनंदाने या उपक्रमास चिपळूणकर वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रत्येक रविवारी चिपळूण शहरातील विविध ठिकाणी हा उपक्रम राबवला जात असून, वाचनप्रेमी नागरिक यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. या उपक्रमात वाचक दोन तास आपल्या आवडीची पुस्तके वाचत असून, त्यानंतर त्या पुस्तकांवर प्रतिक्रिया देतात. आजच्या सत्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष कवी राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, नगरपालिकेतील कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, कर्मचारीवर्ग आणि अनेक वाचकांनी उपस्थिती लावली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 14/Oct/2025