Chiplun Nagar Parishad : चिपळुणात स्लाईड शोद्वारे मिळणार विकासकामांची माहिती

चिपळूण : नागरिकांना नगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांची आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, यासाठी चिपळूण नगरपालिकेने एलईडी टीव्ही बसवला आहे. त्यावर पालिकेच्या योजना, चालू प्रकल्प आणि नागरिकांसाठी उपयुक्त माहिती दाखवली जाणार असल्याचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले.

विविध कामांसाठी दररोज शेकडो नागरिक पालिकेत येतात. अनेकदा मला भेटण्यासाठी त्यांना थांबावे लागते. अशा वेळेत त्यांना नगरपालिका राबवत असलेले उपक्रम आणि योजना समजाव्यात तसेच त्यातून ते स्वतःसाठी व शहरासाठी काय करू शकतात याचा विचार करावा, या उद्देशाने दालनाबाहेर हा एलईडी टीव्ही बसवला आहे.

या स्क्रीनवर पालिकेचे उपक्रम, कामांची छायाचित्रे आणि माहिती दाखवली जात असून, लवकरच नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजनांची माहिती, अर्जप्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे व मार्गदर्शनदेखील प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 14/Oct/2025