चिपळूण : महायुतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यावा, मात्र युती झाली नाही तर पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्ण तयार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण येथे झालेल्या बैठकीत आमदार शेखर निकम यांच्यापुढे सांगितले.
चिपळूण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीव आमदार निकम म्हणाले, इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाकडे मागवले जातील. त्यासाठी एक पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करण्यात येणार असून, या बोचि प्रमुख प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम असतील. पालिकेतील विकासकामांचा विचार केला, तर पालिका आपल्या ताब्यात घेण्यात पक्षाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पक्षातील कार्यकत्यांनी उत्साहाने काम करत नागरिकांशी थेट संवाद साधावा, बॅनर लावून पक्ष मोठा होत नाही, घराघरांत संपर्क साधल्यानेच जनतेचा विश्वास जिंकता येतो. बैठकीत प्रांतिक सरचिटणीस जयद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी उपस्थित होते.
पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा
कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून निवडणुकीत पेटून उठावे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता पक्षाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी व्यक्त केला. तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी या निवडणुका कार्यकत्यांच्या आहेत. सर्वांनी एकजुटीने आणि झटून काम केल्यास पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे शक्य असल्याचे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 14/Oct/2025














