रत्नागिरी जिल्हा कृषी अधिकारीपदी शिवराम सदाफुले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे यांची बदली सातारा येथे झाली. त्यांच्या जागी शिवराम सदाफुले यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदभारही स्वीकारला आहे.

तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांची बदली कोल्हापूर येथे झाल्यामुळे हा पदभार काही महिने अजय शेंडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. मात्र, अजय शेंडे यांची सातारा येथे आत्मा प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे. त्यांनीही पदभार स्वीकारला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 23-10-2024