खेड : खेडमधील ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाले असून, या जाहीर झालेल्या आरक्षणामधून अनेकांचा पत्ता कट झाला आहे. तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण असे सुकीवली नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, भरणे-नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी स्त्री, भडगांव नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, दयाळ सर्वसाधारण, विराचीवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, लोटे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, आणि धामणंद सर्वसाधारण स्त्री.
१४ पंचायत समिती गणांचे आरक्षण असे : सुकीवली- नामाप्र स्त्री, तिसंगी सर्वसाधारण, खवटी नामाप्र स्त्री, भरणे सर्वसाधारण, भडगाव सर्वसाधारण, जामगे अनुसूचिक जाती स्त्री, दयाळ सर्वसाधारण स्त्री बहिरवली सर्वसाधारण, गुणदे सर्वसाधारण, विराचीवाडी लोटे सर्वसाधारण, आंबडस सर्वसाधारण स्त्री, आंजनी सर्वसाधारण स्त्री आणि धामणदेवी सर्वसाधारण स्त्री.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 14/Oct/2025














