रत्नागिरी : गव्याची धडक लागून जखमी झालेल्या ६७ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील अंजनवेल सोनारवाडी येथे घडली आहे. प्रकाश गोपीनाथ खडपे (रा. अंजनवेल सोनारवाडी) असे त्यांचे नाव आहे. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास त्यांना गव्याने धडक दिली.
त्यात ते गंभीर जखमी झाले. १ सप्टेंबर रोजी त्यांना कराड येथे हलवण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असताना २४ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. रविवार १२ रोजी गुहागर पोलिस स्थानकात याची नोंद झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 14/Oct/2025














