Ratnagiri : रत्नागिरीत १७ ऑक्टोबरपासून क्रिकेट प्रशिक्षण शिबिर

रत्नागिरी : उत्तम दर्जेदार क्रिकेटपटू निर्माण व्हावेत यासाठी छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीतर्फे शालेय मुला-मुलींसाठी १७ ते ३१ ऑक्टोबर रोजी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात होणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक राजू सावंत, माजी रणजीपटू हरिश लाडे, दिवाकर मयेकर, अक्षय पाटील, विश्वनाथ लिंगायत व महिला क्रिकेटपटू दर्शना पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. ज्यांना प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 AM 15/Oct/2025