◼️’चुकीच्या प्रदर्शनात खरेदी करून पस्तावलो!’ ग्राहकांची प्रतिक्रिया
➡️ रत्नागिरी, १५ ऑक्टोबर : “दिवाळीची खरेदी चुकीच्या प्रदर्शनात करून आम्ही फसलो,” अशी स्पष्ट प्रतिक्रिया रत्नागिरीतील अनेक ग्राहकांनी ‘रत्नागिरी खबरदार’ आयोजित दिवाळी शॉपिंग फेस्टला भेट दिल्यानंतर व्यक्त केली. रत्नागिरी खबरदारच्या मूळ संकल्पनेची नक्कल करून भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांना ग्राहकांनी सपशेल नाकारले असून, दर्जेदार उत्पादनांनाच आपली पसंती दिली आहे.
▪️’ओरिजिनल’ सुपरहिट, ‘ड्युप्लिकेट’ फ्लॉप
रत्नागिरीमध्ये महिला उद्योजिकांसाठी एका भव्य आणि व्यावसायिक प्रदर्शनाची संकल्पना सर्वप्रथम ‘रत्नागिरी खबरदार’ने यशस्वीपणे राबवली. या उपक्रमाला मिळालेली प्रचंड लोकप्रियता पाहून काहींनी ही संकल्पना, नाव आणि अगदी प्रदर्शनाचे ठिकाण जसेच्या तसे उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, हुबेहूब नक्कल करूनही त्यांना ग्राहकांची मने जिंकता आली नाहीत.
याउलट, ‘रत्नागिरी खबरदार’च्या दिवाळी शॉपिंग फेस्टला मिळालेला ग्राहकांचा प्रतिसाद पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. ग्राहकांच्या या प्रतिसादाने हे सिद्ध केले आहे की, रत्नागिरीकर केवळ नावाला नाही, तर गुणवत्तेला महत्त्व देतात.
▪️यशाचे गमक: निवडक आणि दर्जेदार स्टॉल्स
‘रत्नागिरी खबरदार’च्या प्रदर्शनाच्या यशामागे त्यांची कठोर गुणवत्ता चाचणी हे प्रमुख कारण आहे. या प्रदर्शनात केवळ निवडक आणि दर्जेदार उत्पादने असलेल्या उद्योजिकांनाच स्थान दिले जाते. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि दर महिन्याला तेच तेच स्टॉल लावून फिरणाऱ्या व्यावसायिकांना ‘रत्नागिरी खबरदार’च्या प्रदर्शनात जागा दिली जात नाही. यामुळे ग्राहकांना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि उत्कृष्ट खरेदी करण्याचा अनुभव मिळतो.
ग्राहकांच्या मते, नक्कल केलेल्या प्रदर्शनांमध्ये मात्र तेच तेच आणि घिसेपिटे स्टॉल्स असल्याने निराशा झाली. याउलट ‘रत्नागिरी खबरदार’च्या फेस्टमध्ये दर्जेदार वस्तू आकर्षक ऑफर्ससह मिळत असल्याने त्यांच्या खरेदीचा आनंद द्विगुणीत झाला.
▪️आता उत्सुकता ‘व्युमेन्स कार्निव्हल २०२६’ ची
दिवाळी शॉपिंग फेस्टच्या अभूतपूर्व यशानंतर ‘रत्नागिरी खबरदार’ने आता आपल्या पुढील भव्य प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या ८ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान ‘व्युमेन्स कार्निव्हल २०२६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. या घोषणेनंतर, या प्रदर्शनात काय नवीन आणि खास असणार, याची उत्सुकता ग्राहक वर्गात शिगेला पोहोचली आहे.
या घोषणेसोबतच, दिवाळीच्या वेळी काही ग्राहकांनी केलेली चूक पुन्हा करू नये आणि खरेदी करताना डोळे उघडे ठेवून केवळ दर्जेदार आणि विश्वासार्ह प्रदर्शनांनाच भेट द्यावी, असे जनहितार्थ आवाहनही करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 15-10-2025












