Ratnagiri : कुत्रा आडवा आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून स्वाराचा मृत्यू

रत्नागिरी : शहरातील आरोग्यमंदिर येथील रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने स्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सिद्धांत हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान स्वाराचा मृत्यू झाला.

निखिल सदाशिव लोध (वय ४३, रा. आरोग्यमंदिर, रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल हे आरोग्यमंदिर येथून दुचाकीने पांडवनगरमार्गे जात असताना त्यांच्या गाडीच्या पाठीमागे कुत्रे लागले. त्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा सात ऑगस्टला दुपारी मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 15/Oct/2025