Sangameshwar : जंगलवाडीत हातभट्टीच्या दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळ झाडीझुडपाच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५५० रुपयांची पाच लिटर दारू पोलिसांनी जप्त केली. देवरूख पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सचिन महादेव कांबळे (वय ४३, रा. दाभोळे कोंडवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास जंगलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या टाकीजवळ झाडीझुडपाच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सचिन कांबळे हे विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करत असताना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ५५० रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. याप्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल रेणुका कांबळे यांनी देवरूख पोलिसात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 15/Oct/2025