Ratnagiri : एनसीसी कॅडेटसाठी १० नोव्हेंबर पासून शिबिर

रत्नागिरी : नेव्हल नॅशनल कॅडेट कोअरसाठी १० ते १९ नोव्हेंबर या कालावधीत मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर महाराष्ट्र संचालनालयाच्या राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती लेफ्टनंट कमांडर रमनजुल दीक्षित यांनी दिली.

या शिबिरात ६० कॅडेट्स, २ भारतीय नौदल अधिकारी, ९ नेव्ही सेलर स्टाफ, ३ एएनओ (२ महिला एएनओ आणि १ पुरुष एएनओ) आणि ५ नागरी कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे. या शिबिरातील विद्यार्थी रत्नागिरी ते विजयदुर्ग आणि परत या मार्गावर डीके व्हेलर बोटीने विविध बंदरांवरून प्रवास करतील. एकूण तीन डीके व्हेलर बोटी असतील, ज्या कॅडेट्स चालवतील. या बोटींना दोन भाड्याच्या बचावबोटी (यांत्रिक) आणि एक सेफ्टी बोट (यांत्रिक) सहाय्य करणार आहे, ज्या संपूर्ण प्रवासात सोबत राहतील. सर्व बोटी एकत्र प्रवास करतील. १० नोव्हेंबरला रत्नागिरी ते रनपार, ११ ला रनपार ते पूर्णगड, १२ ला पूर्णगड ते जैतापूर, १३ ला जैतापूर ते विजयदुर्ग, १४ ला विजयदुर्ग ते देवगड, १५ ला देवगड ते विजयदुर्ग, १६ ला विजयदुर्ग ते जैतापूर, १७ ला जैतापूर ते पूर्णगड, १८ ला पूर्णगड ते रनपार, १९ ला रनपार ते रत्नागिरी असा प्रवास होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 15/Oct/2025