पावस : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेत रत्नागिरी वनविभाग कांदळवन यांच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त वनक्षेत्रपाल किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन परिसर जनजागृती कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात प्रकल्प समन्वयक ऋतुजा ठोंबरे व प्रकल्प सहाय्यक शुभम पिलणकर यांनी लॅपटॉपच्या सहाय्याने कांदळवन वनस्पतीचा परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, स्वागत प्रभारी मुख्याध्यापिका संजया पावसकर, आभार प्रदर्शन उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 15/Oct/2025













