चिपळूण : शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेल्या दयनीय अवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध होताच चिपळूण नगर परिषद प्रशासनाकडून खड्डे भरण्यास त्याच रात्री सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रासदायक ठरणारे खड्डे प्रथम बुजविण्यास प्राधान्य दिले.
दिवाळी दोन दिवसांवर आली असून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ सुरू झाली आहे. वाहनांसह नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत येऊ लागले आहेत. चिपळूण शहरात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसभरात मुख्य वर्दळीच्या मार्गावरील खड्डे मजबूत डांबरीकरणाने भरण्यास अडथळे निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने रात्रीच्यावेळी वाहतूक कमी झाल्यावर डांबरीकरणाने पक्क्या स्वरूपात खड्डे भरण्याचे काम सुरू केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 15/Oct/2025













