रत्नागिरीत आज संस्कृत ऑर्केस्ट्रा

रत्नागिरी ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाने बुधवारी (ता. १५) सायंकाळी ५ वा. स्वा. सावरकर नाट्यगृहात संस्कृत-संस्कृती-संध्या अर्थात् संस्कृत ऑर्केस्ट्रा आयोजित केला आहे.

या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद रत्नागिरीकरांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे. संस्कृत ऑर्केस्ट्रा अर्थात् संस्कृत गीतवृंद हा संस्कृत लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने केलेला एक प्रयत्न आहे. संस्कृत भाषेमध्ये गीतरचना आहे, हेही या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचते. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने युवा महोत्सवामध्ये पारितोषिक मिळवलेली गीतेही सादर होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 15-10-2025