रत्नागिरी : राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य विभाग जिल्हा परिषदेच्यामार्फत आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराबाबत व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातही हा कार्यक्रम झाला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत दि. २१ रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र झाडगाव ता. रत्नागिरी अंतर्गत लोकमान्य टिळक विद्यामंदिर, नगरपरिषद शाळा क्र.२, रत्नागिरी येथे राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभार, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र झाडगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी, पर्यवेक्षक बिराजदार, आरोग्य सहाय्यक प्रमोद लिंगायत, शैलेश वाघाटे, मुख्याध्यापक काझी तसेच सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, आशासेविका आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी आयोडिनयुक्त मीठ वापरण्याबाबत जनजागृतीबाबत शपथ घेतली. डॉ. अनिरुद्ध आठल्ये व डॉ. महेंद्र गावडे यांनी आयोडिनचे महत्त्व व आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार याबाबत उपस्थित विद्यर्थ्यांना सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केले. शाळेच्या हॉलमध्ये आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाबाबत रांगोळी स्पर्धा व पोस्टर पेंटिंग स्पर्धा आयोजित करून प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामध्ये उत्कृष्ट स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 23/Oct/2024












