Sangmeshwar: सरंद-गुरववाडी येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी : सरंद गुरववाडी (ता. संगमेश्वर) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज रवींद्र गुरव (वय २२, रा. सरंद-गुरववाडी-संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज गुरव याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून घरातील भालाला नायलॉनची ओढणी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. खबरीवरुन पोलिसांनी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 15-10-2025