खेड : तालुक्यातील भरणे नाका पुलाजवळ सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई दारूबंदी कायद्यानुसार करण्यात आली असून आरोपीविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई महामार्गावरील रॉयल हॉस्पीटलजवळील मोकळ्या जागेत पोलिसांना एक व्यक्ती दारू पित असल्याची माहिती मिळाली.
तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. याप्रकरणी पोलीस शिपाई सोहेल ईक्याल ढगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरोपीचे नाव अशोक विश्राम यादव (वय ४७, रा. मौजे जैतापूर, कावणकरवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला असून, सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 15/Oct/2025














