रत्नागिरी : बीएसएनएल (भारतीय दूरसंचार निगम लि.) कंपनीने जिल्ह्यात नव्या जोमाने काम सुरू केले आहे. खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना जिल्ह्यात ४-जी चे १८८ नवीन टॉवर उभारण्यात येत आहे. त्यापैकी १४० टॉवर सुरू झाले आहेत. भविष्यात ग्राहकांना सर्वांत स्वस्त आणि दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बीएसएनएलचे नेटवर्क जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहचले पाहिजे हे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे बीएसएनएलच्या येथील महाप्रबंधक अमृता लेले यांनी सांगितले.
२ जी सेवेमध्ये असलेल्या बीएसएनएला नवसंजीवणी देण्यासाठी ४ जी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बीएसएनएल कंपनीला पुन्हा चांगले दिवस येणार हे निश्चित आहे. ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी कंपनीने जिल्ह्यात बीएसएनएलचे १८८ नवीन ४जी टॉवर मंजूर केले, त्यापैकी १४० टॉवर उभारण्यात आले आहेत. कंपनीचे जिल्ह्यातील एकूण टॉवर ३६२ झाले आहेत. त्यामुळे नेटवर्कमध्ये चांगली सुधारणा झाल्याचा दावा बीएसएनएलच्यावतीने करण्यात आला आहे. उर्वरित टॉवर लवकरच उभारले जाणार आहे. पावसामुळे हे काम रेंगळले होते. त्यात टॉवरना शेवाळ धरल्याने कामांमध्ये अडथळा येत होता. परंतु आता नव्या जामाने काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात सुमारे पावणे ३ लाख बीएसएनएलचे ग्राहक आहेत. बीएसएनएलच्या नव्या सेवेमुळे दिवसाला सुमारे ८० ते १०० ग्राहक नव्याने मिळत आहेत.
ज्या ठिकाणी महावितरणची जोडणी नाही, तेथे सोलर आणि इंजिनद्वारे वीज पुरवठा केला जातो. नव्या टॉवरला ७१ ठिकाणी महावितरणची जोडणी मिळाली आहे. बहुतांशी मोबाईल टॉवर सुरू झाले आहेत. जोडण्या वाढल्या असून तक्रारी देखील कमी झाल्या आहेत, असे लेले यांनी सांगितले.
जिल्ह्यात अजून ही १ हजार ६०० लॅण्डलाईनधारक आहेत. जोवर सर्व कन्व्हर्ट होत नाहीत तोवर ही सेवा सुरू राहणार आहे. त्यांना कॉपर केबेलने सर्व्हिस दिली जात होती. परंतु आता फायबरने दिली जाणार असल्याने स्पिड वाढणार आहे, असे लेले यांनी सांगितले.
मुंबईतही एमटीएनएल ऐवजी बीएसएनएल
जिल्ह्यातील अनेक नोकरदार मुंबईमध्ये कामाला आहे. परंतु जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा बीएसएनएलची सेवा मिळते. मुंबईत गेल्यानंतर मात्र ती एमटीएनएलमध्ये वर्ग होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा ग्राहक वर्ग तुटत होता. परंतु आम्ही केंद्र शासनाला प्रस्ताव देऊन १ नोव्हेंबरपासून मुंबईत देखील बीएसएनएलची सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे बीएसएनलचा ग्राहक नक्कीच वाढणार आहे, असा विश्वास लेले यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 15/Oct/2025














