चिपळूण : ‘तू तुझ्या बायकोला शिवीगाळ का करतोस’ अशी विचारणा केल्याने मुलाने वडील आणि आईला मारहाण केली. तसेच चुलीसाठी वापरण्यात येणारे लाकूड घेऊन तो वडिलांच्या अंगावर धावत आल्याने त्याची आई मध्ये आली. त्यावेळी त्याने आईच्या डोक्यात लाकूड मारले.
ही घटना रविवारी रात्री देवखेरकी तळ्याचीवाडी (ता. चिपळूण) येथे घडली. याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋतिक राजेंद्र हळदे याच्यावर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 15/Oct/2025














