Yogesh Kadam | एआयच्या वापरामुळे गावे स्मार्ट, समृद्ध होणार : मंत्री योगेश कदम

दापोली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही काळाची गरज आहे. भविष्यात गावांचा विकास एआयच्या माध्यमातूनच शक्य आहे आणि त्यासाठी सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांनी आजपासून तयारीला लागले पाहिजे, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली येथे केले.

दापोली येथे मंत्री योगेश कदम यांच्या ग्राम प्रशासनातील तांत्रिक उपाययोजनांवर आधारित एआय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य तसेच विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत ग्रामविकासासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मंत्री कदम म्हणाले की, एआयच्या सहाय्याने पाणीपुरवठा, अभिलेख व्यवस्थापन, निधी वाटप आणि कृषी निर्णय प्रक्रिया अधिक सुलभ होईल. प्रत्येक सरपंचाने तंत्रज्ञान शिकून त्याचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा, असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 15/Oct/2025