संगमेश्वर : कसबा देवपाटवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत चौघांना सहा महिने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. किशोर देवजी चांदे (वय 54 वर्षे),शुभम राजेश चांदे (वय 21 वर्षे),राजेश देवजी चांदे वय 46 वर्षे आदित्य राजेश चांदे (वय 19 वर्षे राहणार कसबा देवपटवाडी) या सर्वांना न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावास सह दंडाची शिक्षा सुनावलेली आहे.
संतोष रघुनाथ चांदे आणि किशोर चांदे हे एकमेकांचे नातेवाईक असून एकाच वाडीत राहणारे आहेत त्यांच्या जमिनी जागेवरून वाद आहे कसबा देवपट वाडी या ठिकाणी त्यांच्या घराजवळ मोटार सायकल लावण्यासाठी संतोष रघुनाथ चांदे हे प्लास्टिकची शेड बांधत असताना किशोर देवजी चांदे यांनी तुम्ही या ठिकाणी काय करत आहात असे सांगून संतोष चांदे यांची पत्नी संपदा संतोष चांदे यांच्या कानाखाली मारून शिवीगाळ केली त्यानंतर आणखी तिघेजण त्या ठिकाणी येऊन एकमेकांच्या साह्याने वाद-विवाद करून धक्काबुक्की केली व राहत असलेल्या झोपड्याजवळ नेऊन दत्ताराम चांदे यांच्या डोक्यात डाव्या साईडला मारहाण करून दुखापत केली.. या प्रकरणी किशोर देवजी चांदे, शुभम राजेश चांदे ,राजेश देवजी चांदे, आदित्य राजेश चांदे, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता याप्रकरणी देवरुख न्यायालयाने आरोपींना सहा महिने सश्रम कारावास व प्रत्येकी 7000 द्रव्य दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कारवास आणि 323 प्रमाणे दोन महिने सश्रम कारावास, 506 प्रमाणे एक महिना आधीवासासह शिक्षा सुनावलेले आहे.
याप्रकरणी तपासीक अंमलदार म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष झापडेकर, साळूखे यांनी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शकाखाली काही तपास केला. सरकारी वकील म्हणून श्रीमती अमृता गुरुपादगोळ यांनी कामकाज पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:25 23-10-2024














