Khed : मेटे मोहल्ल्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड : तालुक्यातील मेटे मोहल्ला येथे एका तरुणाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी रात्री अंदाजे १०.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत तरुणाचे नाव आतिश अशोक दिवेकर (वय २९, रा. मेटे मोहल्ला, पोस्ट असगणी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे असून, त्यांनी घरातील खोलीचे दरवाजे आतून बंद करून लाकडी भाल्याला भगव्या रंगाच्या नायलॉन साडीने गळफास घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 16/Oct/2025