Chiplun : स्वयंम् कार्यशाळेतून उद्योजकतेला चालना

चिपळूण : कन्साई नेरोलॅक पेंटस् लिमिटेड कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्त्वातून व उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर यांच्या विद्यमाने ग्रामीण महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठीच्या स्वयंम् कार्यशाळेचे दोन दिवसीय सत्र नुकतेच झाले. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योगासाठीच्या अर्थसहाय्य संदभनि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्येक महिन्याला एक या पद्धतीने सात कार्यशाळा होणार असून यापैकी तीन कार्यशाळा झाल्या आहेत.

व्यवसाय आराखडा, कायदेशीर बाबी आणि परवाना मिळण्याची मूलभूत माहिती, लहान व्यवसायासाठी मूलभूत कायदेशीर संरचना आणि विविध प्रकारचे उत्पादन सेवा आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण विक्री, लक्षित ग्राहक गट ओळखणे यावर आढावा या कार्यशाळेमध्ये घेण्यात आला. या संदभनि मार्गदर्शन अभिषेक कदम यांनी केले. सुरेंद्र वैद्य यांनी कंपनीमध्ये अनुभवलेली महिलांची सहकार चळवळ याविषयी सविस्तर माहिती दिली.

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योग निरीक्षक अर्चना सपकाळ यांनीही विविध योजनांची माहिती दिली. उत्पादन प्रक्रिया असलेल्या उद्योगासाठी जास्तीत जास्त प्रकल्प किंमत १ कोटीपर्यंत तर सेवा उद्योगासाठी कमाल ५० लाख पर्यंतचे प्रकल्प उभारता येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सीमा यादव यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 16/Oct/2025